KOLHAPUR ACCIDENT: हार्ट अटॅक आला अन् सगळं संपलं; कोल्हापुरातील 'त्या' भीषण अपघाताचं कारण समोर

KOLHAPUR ACCIDENT: हार्ट अटॅक आला अन् सगळं संपलं; कोल्हापुरातील ‘त्या’ भीषण अपघाताचं कारण समोर

1592 0

नुकतच कोल्हापुरातील (kolhapur accident) एका भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज सगळीकडे व्हायरल होताना पाहायला मिळतंय. या फुटेज मध्ये भरधाव वेगात आलेली एक कार अनेक गाड्यांना धडक देऊन पुढे जाताना दिसत आहे. या भीषण अपघातानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. हा अपघात नेमका का झाला ? याचं धक्कादायक कारण आता समोर आलं आहे.

हा अपघात कोल्हापूरच्या बीएसएनएल टॉवरपासून टाकळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ झाला. अपघात झालेली कार 55 वर्षीय धीरज शिवाजीराव पाटील हे चालवत होते. ही कार उड्डाणपूला शेजारी लावलेल्या अनेक वाहनांना धडकून पुढे गेली. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र तसं नसून खरंतर कार चालवणाऱ्या धीरज पाटील यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांचं कार वरचं नियंत्रण सुटलं आणि हा भीषण अपघात घडला. या अपघातात चालक धीरज पाटील यांचा मृत्यू झाला. पाटील हे दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचा पुतणे असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या अपघात प्रकरणी कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस तपास सुरु 

या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तुफान चर्चा होताना दिसत आहेत. या प्रकरणी पुन्हा दाखल झाला असल्याने नेमका अपघात कोणत्या कारणाने झाला याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र प्राथमिक माहितीनुसार चालक धीरज पाटील यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Share This News
error: Content is protected !!