छत्रपती संभाजी महाराज यांना हाल हाल करून मारणारा औरंगजेब हा इतिहासातील सर्वात क्रूर शासक मानला जातो. त्यामुळेच महाराष्ट्रातच काय तर संपूर्ण भारतात औरंगजेबाचा विरोध केला जातो. त्यातच औरंगजेबाची कबर काढण्या वरून सध्या राज्यात वादविवाद सुरू आहेत. त्यातच याच निष्ठुर औरंगजेबचे स्टेटस (AURANGZEB STATUS CASE) ठेवणाऱ्या 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोलापूरच्या अक्कलकोट (SOLAPUR POLICE) मध्ये घडली आहे.
सोलापुरातील आमदार सचिन कल्याणशेट्टी विधानसभेत औरंगजेबचे स्टेटस ठेवणा-यांच्या विरोधात आक्रमक झाले. औरंगजेबचे स्टेटस ठेवणा-यांच्या मुस्क्या आवळा अशी मागणी विधानसभेत सचिन कल्याणशेट्टी यांनी केली होती. त्यास आमदारांच्या शहरात अर्थात सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावामध्ये 14 व्यक्तीनी औरंगजेबचे स्टेटस ठेवले होते. हे स्टेटस ठेवाणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्यांची संख्या वाढली
यापूर्वी नवी मुंबईतील वाशीमध्ये देखील औरंगजेबचे स्टेटस ठेवल्यानं एकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी आसपासच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेऊन त्याला समज दिली होती. दरम्यान दोन ते तीन वेळा औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याचे प्रकरण आता समोर आली आहेत. त्यामुळे ही प्रकरण वारंवार समोर येत असल्याचे खंत ही व्यक्त केली जात आहे.