पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवन मध्ये आज सकाळी कंटेनरचा भीषण अपघात घडला असून या अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे..
पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या या कंटेनरचा भिगवन मध्ये भीषण अपघात झाला असून पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील साईडचे सुरक्षा कठडे तोडून कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने पुलावरून खाली 25 ते 30 फूट खोल सर्विस रोडवर कंटेनर पडला आणि यामुळे अपघात घडला या अपघातात कंटेनर चालकाचा मृत्यू झालाय. श्रवणकुमार भागवती प्रसाद (वय 37) असं कंटेनर चालकाचं नाव आहे.