स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शरद पवार गट ॲक्शन मोडवर; उद्या पुण्यात होणार महत्त्वाची बैठक

834 0

राज्यात नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ दहा जागांवर यश मिळवता आलं.

मात्र आता आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कंबर कसले असून उद्या पुण्यात महत्त्वाची बैठक होणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वाची बैठक मानली जात आहे.

या बैठकीला खासदार  सुप्रिया सुळे, पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी मा.मंत्री  शशिकांत  शिंदे तसेच मा.मंत्री श्री. हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार आहेत.

पुणे शहरातील आजी माजी खासदार -आमदार ,नगरसेवक तथा पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व एकनिष्ठ कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असं आवाहन पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलं आहे

 

Share This News
error: Content is protected !!