खून करून फरार झालेला पंडित गॅंगचा मोरक्या पुणे पोलिसांच्या ताब्यात

498 0

 

पुण्यातील मंगला चित्रपट गृहाबाहेर दोन वर्षांपूर्वी नितीन म्हस्के नावाच्या व्यक्तीचा खून करून फरार झालेल्या आरोपीला पकडण्यात अखेर पुणे पोलिसांना यश आलं आहे. सूर्यकांत कांबळे असं या आरोपीचं नाव असून तो पंडित गँगचा म्होरक्या आहे.

या खून प्रकरणी आधीच 17 आरोपींना अटक करण्यात आली असून कांबळे मात्र अद्याप फरार होता.

दरम्यान याच सूर्यकांत कांबळे उर्फ पंडित याने वयाच्या 13 व्या वर्षी आपल्याच साथीदाराचा खून केला होता. तेव्हापासून त्याची दांडेकर पूल, दत्तवाडी, ताडीवाला रोड या परिसरात दहशत होती.

Share This News
error: Content is protected !!