आरोपीने तिला गर्भपात करण्यास भाग पाडलं

चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडेखोराचा पोलिसांवर हल्ला

405 0

राज्यासह पुणे (Pune) जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशातच चाकणमध्ये दरोडेखोरांना पकडायला गेलेल्या पोलिसांवरच कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बहुळ गावातील दरोडा प्रकरणातील दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच आरोपींनी जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि फौजदार प्रसन्न जराड जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माहितीनुसार, खेड तालुक्यातील चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत बहुळ येथे काही दिवसांपूर्वी वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून सहा दरोडेखोरांनी चाकू आणि सुरीचा धाक दाखवत लूटमार केली होती. त्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून धूम ठोकली होती. या प्रकरणातील दरोडेखोर हे चिंचोशी गावात आणखी एक दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना रविवारी (दि. २ मार्च) रात्री मिळाली. त्यानुसार, पोलिस उपायुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या दोन पथकांनी केंदूर घाटात सापळा लावला. दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न करताच त्यांनी पोलिसांवर थेट कोयत्याने हल्ला चढवला. यातील एका दरोडेखाने त्याच्याकडील कोयत्याने वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यात पोलिस उपायुक्त शिवाजी पवार आणि फौजदार प्रसन्न जराड जखमी झाले.

Share This News
error: Content is protected !!