लवकरच परिवहन विभागाच्या 45 सेवादेखील व्हॉट्सअपवर…

478 0

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळी, मुंबई येथे आज परिवहन आयुक्त कार्यालय ‘परिवहन भवन’ इमारतीचे भूमिपूजन केले. तसेच धर्मवीर आनंद दिघे ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळांतर्गत सन्मान निधी वितरण आणि परिवहन विभागातर्फे नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या फेसलेस सुविधांचे लोकार्पणही  झाले.

85 वर्षांनंतर परिवहन विभागाला अतिशय सुंदर मुख्यालयाची इमारत मिळणार असून गेल्या दोन वर्षांत परिवहन विभागाच्या 45 फेसलेस सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. नुकताच राज्य शासनाने मेटासोबत व्हॉट्सअप गव्हर्नन्ससाठी करार केला आहे. यामुळे विविध विभागांच्या 500 अधिसूचित सेवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. आता यामध्ये परिवहन विभागाच्या 45 सेवांचादेखील समावेश करण्याचा प्रयत्न करणार आहोत. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री मंगलप्रभात लोढा मनिषा कायंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!