Breaking News

BREAKING NEWS स्वारगेट बस अत्याचार प्रकरण: आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्च पर्यंतची पोलीस कोठडी

794 0

स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्च पर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

तब्बल सत्तर तास पोलिसांपासून लपून राहिल्यानंतर पुणे पोलिसांनी सापळा रचत आरोपीला अटक केली होती

मध्यरात्री पोलिसांनी ड्रोन आणि श्वान पथकाच्या सहाय्याने आरोपीचा माग काढला आणि एका कॅनलजवळून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

मागच्या ७० तासांपासून आरोपी गुणाट गावाजवळील एका उसाच्या शेतात लपून बसला होता. मात्र त्याच्या एका चुकीमुळे तो पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. दोन दिवस उसाच्या शेतात लपून बसला होता. पण इथं त्याला जेवायला मिळत नव्हतं.

भूकेनं व्याकूळ झाल्यानंतर आरोपी पाणी पिण्यासाठी दोन दिवस रात्री त्याच्या नातेवाईकांकडे येऊन गेला होता. याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी ड्रोन आणि श्वान पथकाच्या सहाय्याने उसाच्या शेतात शोध घेतला. अखेर पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी 100 पोलिसांचा ताफा, डॉग स्कॉड गुनाट गावात दाखल झालं होतं. दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पोलिसांनी 13 पथकं तयार केली होती. पुणे पोलिसांनी गाडे याला शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून पकडण्यात आलं आहे.

Share This News
error: Content is protected !!