नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर पुण्यातील ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिक आक्रमक

2504 0

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर पुण्यातील ठाकरे गटाच्या नेत्या गोऱ्हे यांच्या विरोधात आक्रमक झाल्या. यावेळी गोऱ्हे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नीलम गोऱ्हे ज्या गाड्यांमध्ये फिरतात त्या शिवसैनिकांनी दिल्या आहेत. उध्द्वव ठाकरेंनी मर्सिडीज दिल्याच्या त्यांनी पावत्या द्याव्यात. मर्सिडीज देण्यासाठी नीलम गोऱ्हे यांच्याकडे एवढे पैसे आले कुठून. गोऱ्हे यांच्याकडून आमच्याविरोधात पोलिसांचा वापर करण्यात आल्याचं ही यावेळी ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या म्हणाल्या.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीत सुरु आहे. या ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी धक्कादायक विधान केले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एक पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागत होत्या, असा मोठा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडीजवर एक पद मिळत होते, प्रत्येक सभेला ठाण्यात माणसे येत होती. त्यांची लोक संपूर्ण तयारी करत होते. आता उद्धव ठाकरे गटाचे लोकही समोर नाही. २०१४ नंतर काही गोष्टी बदलल्या गेल्या. काही लोकांना सातत्याने घेणे सुरु झाले. बाळासाहेब ठाकरे यांचे पक्ष संघटनेवर लक्ष होते. त्यानंतर ते राहिले नाही. लोकांना भेटले गेले पाहिजे. ते होत नव्हते. मी काहीच दिले नाही. मला एक रुपया पक्षाने मागितले नाही. त्याबद्दल मी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे ऋणी आहे. माझ्यासारखे अपवाद सोडले तर या गोष्टी घडत होत्या. व्यक्ती म्हणून उद्धव साहेब संस्कृत नेते आहे. परंतु त्यांना वेळेचे नियोजन करता आले नाही, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले.नीलम गोऱ्हे यांच्या विधानावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे.

Share This News
error: Content is protected !!