27 वर्षानंतर राजधानी दिल्लीत भाजपाचा कमळ फुलल्यानंतर आता रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आले आहे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेल्या रेखा गुप्ता नेमक्या आहेत तरी कोण पाहूयात…
5 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान पार पडलं तर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी पार पडली या निकालात तब्बल 48 जागा जिंकत तब्बल 27 वर्षानंतर राजधानीत भाजपाचा कमळ फुल्ल तर सलग दहा वर्ष सत्तेत राहिलेल्या आम आदमी पक्षाला केवळ 22 जागा मिळाल्या निकालानंतर तब्बल 18 दिवसांनी दिल्लीला मुख्यमंत्री मिळाला असून पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत
कोण आहेत रेखा गुप्ता?.
* रेखा गुप्ता या लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडल्या गेल्यात
* अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी दशेतच त्यांनी राजकारणात प्रवेश केला
* 1994-95 मध्ये दौलत राम कॉलेजच्या अभाविपच्या सचिव म्हणून निवडल्या गेल्या
* रेखा गुप्ता सन 2003-2004 साली भाजप दिल्ली युवा मोर्चाच्या सचिव झाल्या
* त्यानंतर 2004-2006 ला युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव झाल्या.
* रेखा गुप्ता या पेशाने वकील आहेत.
* रेखा गुप्ता शालीमार बाग मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.
*त्यांनी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा 29,595 मतांनी पराभव केला.
दरम्यान रेखा गुप्ता या भाजपाच्या दुसऱ्या तर दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असणार आहेत.