शिक्षिकेचे विद्यार्थिनीसोबत वर्गातच नृत्य, व्हिडिओ व्हायरल (व्हिडिओ)

604 0

नवी दिल्ली- ‘तारे जमीन पर’ या चित्रपटातील अमीर खानच्या भूमिकेची आठवण करून देणारा एक जबरदस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. दिल्लीच्या एका सरकारी शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थिनीसोबत वर्गातच डान्स केला आहे आणि या डान्सच्या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे.

या व्हिडीओतील शिक्षिका मनु गुलाटी यांनी ‘मॅडम आप भी करो, मैं सिखाऊंगी’ असे लिहून ट्विटर प्रोफाइलवर हा डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. वर्गात आनंददायक वातावरण तयार केल्याबद्दल अनेकांनी या व्हिडिओला चांगला प्रतिसाद देत शिक्षिकेचं कौतुक केले आहे. या व्हिडिओ मध्ये विद्यार्थिनी डान्स करत आहे आणि तिच्याबरोबर शिक्षिकेने सुद्धा ठेका धरला आहे. वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत आनंद घेताना दिसत आहेत.

Share This News
error: Content is protected !!