DELHI PARVESH VARMA LOAN | केजरीवालांचा पराभव करणाऱ्या परवेश वर्मांवर तब्बल ‘इतक्या’ कोटींचं कर्ज

674 0

नुकताच दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून 10 वर्षांची ‘आप’च्या सत्तेला हादरा देत 27 वर्षांनंतर दिल्लीत भाजपचं कमळ फुललं.

या दिल्लीच्या निकालानंतर सर्वाधिक चर्चा झाली ती परवेश वर्मां यांची. अरविंद केजरीवाल यांचा पराभव करत परवेश वर्मां ‘जायंट किलर’ ठरले. मात्र वर्मा यांच्यावर आता काही कोटींचं कर्ज असल्याचं समोर आलंय… नेमकं परवेश वर्मां किती कर्ज आहे पाहुयात…

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडले या निकालात आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासारख्या आजच्या अनेक दिग्गजांना पराभूत व्हावं लागलं सलग दहा वर्ष सत्तेत असणाऱ्या आम आदमी पक्षाला या निवडणुकीत केवळ 22 जागांवर समाधान मानावं लागलं..

दिल्लीतील निकाल जाहीर झाल्यानंतर परवेश वर्मा यांची सर्वाधिक चर्चा झाली वर्मा यांनी 4,089 मतांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला. मात्र आता याच वर्मांवर 62 कोटींचं कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे.

वर्मा यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकूण 95 कोटी रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये शेतजमीन, गोदामे आणि घरे यांचा समावेश आहे. त्यांनी 77.89 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 12.19 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचं म्हटलं आहे.

ARVIND KEJRIWAL LOSS| माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा पराभव

Share This News
error: Content is protected !!