राज ठाकरे नंतर औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील ‘या’ तारखेला घेणार सभा

299 0

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील औरंगाबादमध्ये सभा होणार आहे अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे. आगामी काळात शिवसेनेच्या राज्यभर सभा होणार असून १४ मे रोजी मुंबईत बीकेसी येथे आणि ८ जून रोजी औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभा होणार असल्याची माहिती दिली.

मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या राज्यभरातील संपर्क प्रमुखांना आज ऑनलाईन मार्गदर्शन केले. संजय राऊत म्हणाले. “शिवसेना पक्षप्रमुखांना राज्यभरातील शिवसैनिकांना एक संदेश दिला आहे. संघटना बांधणीत कुठेही मागे राहता कामा नये, हल्ल्याला प्रतिहल्ला करावाच लागेल. ढोंगाचे बुरखे फाडावेच लागतील. विशेषता जे बनावट हिंदुत्ववादी आहेत, त्यांचं आव्हान वैगेरे आम्हाला काही नाही, आम्ही लढू. १४ तारखेला बीकेसी मध्ये सभा आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये ८ जून रोजी सभेसाठी येणार आहेत आणि महाराष्ट्रात फिरण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला”

उद्धव ठाकरेसुद्धा अयोध्या दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. लवकरच त्यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर केली जाणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!