PUNE NEWS: पुण्यात चाललंय तरी काय ?; महिलेसमोर लघुशंका करणाऱ्याला हटकल्याने पाच जणांकडून पती-पत्नीवर कोयत्याने वार

PUNE KOTHRUD CRIME NEWS: …अन् त्याने भर रस्त्यात केले आईच्या बॉयफ्रेंडवर सपासप वार

795 0

पुणे म्हटलं की काय आठवायचं ? उत्तम दर्जाचं शिक्षण, संस्कृती जपणारं सायकलींचं शहर, मानाच्या गणपतींचं आणि शांती प्रेमी पुणेकरांचं शहर… मात्र आता पुणे म्हटलं की काय आठवतं ? कोयता गॅंग, ड्रग्स रॅकेट, महिला अत्याचार, गॅंग वॉर आणि बरंच काही… पुण्याच्या यात नव्या ओळखीत भर घालणारी आणि सर्वसामान्य माणसाचा थरकाप उडवणारी घटना पुण्यात घडली. कोथरूड परिसरात (pune kothrud crime news) चार अल्पवयीन आरोपींनी मिळून भर रस्त्यात एकावर कोयत्याने (koyta gang) सपासप वार केले. आणि हत्येमागचं कोणालाही चक्रावून टाकणारं कारण आणि हत्येचा थरकाप उडवणारा व्हिडिओ (viral video) ही समोर आला.

हत्येचं चक्रावून टाकणारं कारण

सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोथरूडच्या सागर कॉलनी परिसरातून राहुल जाधव हा तरुण आपल्या दुचाकीवरून जात होता. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्याला घेरलं. त्याला अडवून शिवीगाळ केली. हे प्रकरण केवळ शाब्दिक वादांपर्यंत थांबेल असं रस्त्यावरच्या इतर लोकांना वाटत होतं. मात्र त्याच वेळी या आरोपींनी चक्क पालघन आणि कोयते काढले. कुणाला काही कळायच्या आत राहुलवर सपासप वार केले. अमानुषपणे राहुलची हत्या करण्याच्या उद्देशानेच या आरोपींनी त्याच्यावर वार केले. बघता बघता गर्दी जमा झाली. गर्दीने आपल्याला पकडायच्या आत आपण पसार व्हावं असा विचार करत आरोपींनी पळ काढला. पुढच्या काहीच वेळात एक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अत्यंत जखमी अवस्थेत असलेल्या राहुलला जवळच्याच रुग्णालयात दाखल केलं गेलं. मात्र उपचारादरम्यान अतिरक्त स्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. दुसरीकडे पोलिसांनी लागलीच या आरोपींचा शोध सुरू केला. व काही वेळातच चारही आरोपींना ताब्यात घेतलं. त्यानंतर या आरोपींकडून हत्येच्या प्रयत्नामागचं धक्कादायक कारण समोर आलं. या आरोपींपैकी एका अल्पवयीन मुलाच्या आईचे राहुल बरोबर अनैतिक संबंध होते. त्याचीच कूणकूण या मुलाला लागली. त्यावरून या मुलाने राहुलला जीवे मारण्याची धमकी दिली. आपल्या आई पासून लांब राहायला सांगितलं. मात्र आईचे अनैतिक संबंध सुरूच असल्याने अखेर या मुलाने राहुलला संपवण्याचा निर्णय घेतला.. आणि त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये राहुल जाधवचा मृत्यू झाला.

कोयते नाचवले

घटनास्थळी जमलेल्या गर्दीने सांगितल्याप्रमाणे हे आरोपी दिवसाढवळ्या भर रस्त्यात राहुलवर वार करून परत जाताना कोयते आणि पालघन नाचवत गेले. संपूर्ण परिसरामध्ये दहशत माजवत गेले. त्यामुळेच या आरोपींना पकडण्याची किंवा राहुलला वाचवण्याची हिम्मत कुणाचीच झाली नाही. त्यातच हे सगळे आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच अल्पवयीन मुलांकडून होत असलेल्या गंभीर गुन्ह्यांची संख्या पुण्यात दिवसेंदिवस वाढत जात आहे‌. त्यामुळेच गुन्हेगारांना सज्ञान समजण्यासाठी त्यांचं वय 18 वरून 14 केलं जावं अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. त्यावर सरकारमध्ये देखील चर्चा सुरू आहे. आणि हा निर्णय लवकरात लवकर घेतल्यास गुन्हेगारीला आळा बसायला मदत होईल.

 

Share This News
error: Content is protected !!