राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना, वढू येथे संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार

469 0

पुणे- औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे आज पुण्याहून रवाना झाले आहेत. आज ते वढू येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा आहे. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मनसैनिकांनी जोरदार तयारी केली आहे.

मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून काढलं आहे. त्यातच राज ठाकरेंच्या उद्या औरंगाबादेत होणाऱ्या बहुचर्चित सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा आज पुणे ते औरंगाबाद दौराही चर्चेत आहे.

औरंगाबाद कडे रवाना होण्यापूर्वी राज ठाकरे यांच्या पुण्यातील घराबाहेर १०० ते २०० पुरोहितांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले. या पुरोहितांच्या आशीर्वाद घेऊन राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले. राज ठाकरे यांच्यासोबत मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि काही नेते औरंगाबादच्या दिशेने निघाले आहेत.

राज ठाकरे यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा आहे. पुणे ते औरंगाबाद दरम्यान राज ठाकरे यांच्या जागोजागी स्वागताची तयारी मनसैनिकांनी केलीय. राज ठाकरे पुण्यातून निघाल्यानंतर जवळच असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू इथल्या समाधी ठिकाणी जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते पुढे औरंगाबादकडे रवाना होतील. औरंगाबादच्या सभेआधी संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाण्याचा निर्णय घेऊन राज यांनी वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय.

राज ठाकरे यांची उद्या औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. महाराष्ट्र दिनी होणाऱ्या या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. औरंगाबादमध्ये होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!