‘जगमित्र’ची सूत्रे धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडेंच्या हाती

681 0

एकीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडविरोधात रोष वाढत असतानाच बीडमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. वाल्मीक कराडच्या परळीतील जगमित्र या कार्यालयाचा कारभार आता धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांच्या हाती आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे. अशातच वाल्मिक कराडच्या परळीतील जगमित्र या कार्यालयाची सूत्रे अजय मुंडे यांच्या हाती आली आहेत. याच कार्यालयातून वाल्मिक कराड नागरिकांचे प्रश्न सोडवत होता. वाल्मीक कराडच्या खुर्चीवर आता धनंजय मुंडे यांचे भाऊ अजय मुंडे बसत असून जगमित्र कार्यालयाचा कारभार अजय मुंडे सांभाळत आहेत. अजय मुंडे हे जिल्हा परिषदेचे सदस्य असून गटनेते देखील आहेत. तसेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक ही आहेत.

Share This News
error: Content is protected !!