एमपीएससीचा निकाल जाहीर; सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात प्रथम

535 0

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० चा निकाल जाहीर करण्यात आला असून, प्रमोद चौगुले हा राज्यात प्रथम आला आहे. तर, निलेश कदम दुसरा तर, रुपली माने हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

कोरोना काळ, त्यानंतर परीक्षेत आलेल्या अनेक अडचणी यानंतर आता मोठी प्रतिक्षा केल्यानंतर उमेदवारांसमोर परीक्षेचे निकाल आले आहे. या निकालांमुळे आता अनेकांना आपल्या भवितव्याचा मार्ग मिळणार असून, तणावात गेलेल्या विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत प्रमोद चौगुले याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला, तर रूपाली माने महिलांमधून पहिली आली आहे. अंतिम निकालाची गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे मुलाखती संपल्यानंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात आला.

Share This News
error: Content is protected !!