मोठी बातमी ! जळगावात मोठी रेल्वे दुर्घटना; एस्क्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली अन्…

307 0

जळगावच्या परांडा स्टेशनजवळ मोठा रेल्वे अपघात झाला आहे. धावत्या ट्रेनमधून प्रवाशांनी उड्या मारल्या. त्याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना धडक दिली. यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाच्या जवळ ही रेल्वे दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरली, त्यानंतर अनेकांनी धावत्या एक्स्प्रेसमधून उड्या मारल्या, याचदरम्यान ही दुर्घटना घडली आहे.पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरली, त्यानंतर अनेकांनी धावत्या एक्स्प्रेसमधून उड्या मारल्या, आग लागल्याची अफवा पसरताच 30 ते 35 जणांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. त्यातच समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत होती. या एक्स्प्रेसनं पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या मारलेल्या प्रवाशांना चिरडलं. यात अनेक जण जखमी झाले असून काही जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्सप्रेस अचानक थांबली. त्यामुळे ठिणग्या उडाल्या आणि धूर निघू लागला. एक्सप्रेसमध्ये आग लागल्याचा काही प्रवाशांचा समज झाला. त्यातीलच अनेकांनी भीतीपोटी रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या आणि हा अपघात घडला. घटनास्थळी रेल्वे कर्मचारी आणि जळगाव पोलीस पोहोचले आहेत.

Share This News
error: Content is protected !!