मोठी बातमी ! वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

1490 0

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आणि आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड न्यायालयानं ही कोठडी सुनावली आहे. यापूर्वी कराडवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्याला पोलीस कोठडीही सुनावण्यात आली होती. ही पोलीस कोठडी आज संपणार होती. त्यापूर्वी त्याला बीड न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान बीड न्यायालयानं त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. ‘सीआयडी’कडून वाढीव कोठडीची मागणी करण्यात आली नाही. चौकशी पूर्ण झाल्याचं सांगत ‘सीआयडी’कडून वाढीव कोठडीची मागणी न करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. ‘व्हिसी’द्वारे वाल्मीक कराडची आजची ही सुनावणी पार पडली.

( सविस्तर बातमी लवकरच… )

Share This News
error: Content is protected !!