Pune-Nashik Highway Accident: आज सकाळी पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ भीषण अपघात झाला. ( Pune-Nashik Highway Accident) आयशर टेम्पोने प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्झिमो गाडीला जोरदार धडक दिली, ज्यामुळे गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्यानंतर मॅक्झिमो गाडी समोरच्या एसटी बसला जाऊन धडकली.
Open Letter To CM:मी…संतोष देशमुख बोलतोय! Santosh Deshmukh यांचं मुख्यमंत्र्यांना अनावृत्त पत्र!
या अपघातात मॅक्झिमो गाडीचा चुराडा झाला आणि गाडीतील 9 प्रवाशांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तीन जखमींनी उपचारादरम्यान प्राण सोडले. अपघातामध्ये इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे तर त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचं समजत आहे.
प्रत्यक्षदर्शीने कडून असं सांगण्यात येत आहे कि, आयशर टेम्पोने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे त्या प्रयत्नात मॅक्झिमो गाडीला धडक दिली.