VALMIK KARAD SON SUSHIL KARAD : वाल्मीक कराडच्या मुलाचा प्रताप! बंदुकीचा धाक दाखवून कोट्यावधींचा मुद्देमाल ताब्यात घेतल्याचा आरोप

VALMIK KARAD SON SUSHIL KARAD : वाल्मीक कराडच्या मुलाचा प्रताप! बंदुकीचा धाक दाखवून कोट्यावधींचा मुद्देमाल ताब्यात घेतल्याचा आरोप

833 0

संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात वाल्मिक कराड (valmik Karad) याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मात्र आता त्याच्याच पाठोपाठ त्याचा मुलगा सुशील कराड (Sushil Karad) देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. कराडच्या मुलावर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात (Solapur court) खाजगी फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडने त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून दोन बल्कर ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मॅनेजरच्या पत्नीने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली आहे.

या प्रकरणात वाल्मीक कराडच्या मुलासह त्याचे मित्र गोपी गंजेवार आणि अनिल मुंडे हे देखील अडचणीत येणार असून त्यांच्यावरही खाजगी फिर्याद दाखल करून घेण्याची मागणी केली आहे. संबंधित मॅनेजरच्या पत्नीने याबाबत सोलापुरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन, सोलापूर पोलीस आयुक्त आणि बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

याप्रकरणी या महिलेने केलेल्या आरोपांवर वाल्मीक कराड यांच्या मुलासह त्याच्या मित्रांनी देखील आपलं म्हणणं मांडलं आहे. याप्रकरणी 13 जानेवारीला सुनावणी होणार आहे. ये सुनावणीत सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय काय निर्णय देतं, याकडे सध्या सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

Share This News
error: Content is protected !!