Pune woman suicide attempt case: दिनांक ०८/०१/२०२५ रोजी १२/४० वा. सुमारास शिवाजीनगर (shivaji nagar pune) दामिनी मार्शल (damini marshal) हिने माहिती दिली की, एक महिला या मार्केटयार्ड येथे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे (Pune woman suicide attempt case) व तिचे लोकेशन मार्केटयार्ड हद्दीतील दिसत आहे. तेव्हा दामिनी मार्शल(damini marshal) ने दिलेल्या माहिती वरून भरोसा सेल. पुणे शहर च्या वपोनी श्रीमती संगीता जाधव व म. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बागुल(priyanka bagul) तात्काळ मार्केटयार्ड दामिनी मार्शल यांच्याशी संपर्क करून त्यांना सदर ठिकाणी जाण्यास सांगितले, तिथे गेल्यावर सदर महिलेचा शोध घेतला असता, सदर महिलेचे लोकेशन पर्वती पो. स्टे. हद्दीतील आलेने त्यानंतर तात्काळ पर्वती पोलीस दामिनी मार्शल यांनी तिचा शोध घेतला असता ती पर्वती पायथा येथे मिळून आली, तेव्हा सदर महिलेस पर्वती दामिनी मार्शल महिला पोलीस अंमलदार सपकाळ व पर्वती दर्शन मार्शल पोलीस अंमलदार भरगुडे व ठाकरे आणि जनता मार्शल पोलीस अंमलदार चव्हाण व मंडलिक यांच्यासह व दामिनी स्वारगेट मार्शल वरील महिला पोलीस अंमलदार धायतडक, मार्केट यार्ड दामिनी मार्शल महिला पोलीस अंमलदार घाडगे यांच्यासह शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले.
VALMIK KARAD संदर्भातील ‘ती’ शिफारस धनंजय मुंडे यांना होणार भोवणार? नेमकं प्रकरण काय
तिथे त्यांची विचारपूस करून आत्महत्येचे कारण विचारले असता, तिने सांगितले की, नवऱ्यासोबत काल रात्री किरकोळ कारणावरून वाद झाले होते. सदर महिलेचे व तिच्या नवऱ्याचे समुपदेशन केले. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे त्यांना वरिष्ठांच्या समक्ष नेऊन,सदर महिला यांचे मामा-मामी,पती आणि इतर नातेवाईक यांच्या ताब्यात सुखरूप दिले आहे.
सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस स्टेशन. पुणे श्री सावंत व भरोसा सेल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता जाधव , म. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बागुल भरोसा सेल गुन्हे शाखा, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील दामिनी मार्शल वरील स्टाफ व पोलीस स्टेशन मार्शल वरील स्टाफ यांनी केली आहे.