PUNE CRIME: वारकरी शाळेत महाराजाने केले दोन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार; पुण्यातील आळंदी भागात खळबळ

PUNE CRIME: वारकरी शाळेत महाराजाने केले दोन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार; पुण्यातील आळंदी भागात खळबळ

804 0

पुण्यात दररोज लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनासमोर येत आहेत. अशातच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Pune crime) पुण्यातील आळंदी येथील एका वारकरी शिक्षण संस्थेतील महाराजानेच दोन अल्पवयीन मुलांवर (POCSO) लैंगिक अत्याचार (sexual abuse)केल्याची घटना घडली आहे.

आळंदी हे अनेक एका वारकरी शिक्षण संस्था आहेत. अशाच एका शिक्षण संस्थेत पीडित मुलं शिक्षण घेत आहेत. या दोन मुलांवर त्यांनची देखरेख करणाऱ्या 28 वर्षीय महाराजाने पण अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत नराधम महाराजाला एका महिलेने मदत केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पोलिसांनी महाराजासह या महिलेवर देखील गुन्हा दाखल केला आहे. महेश नामदेव मिसाळ (वय २८ वर्षे रा. खोकरमोहा, ता. शिररकासार, जि. बीड) असं आरोपी महाराजाचं नाव आहे.

नेमकं प्रकरण काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, ही आळंदी येथील वडगाव रस्त्यावर असलेल्या ज्ञानेश्वरी गुरुकुल संस्थेत ४ डिसेंबर रोजी घडली आहे. अल्पवयीन मुले याच शाळेत वारकरी शिक्षण घेत आहेत. तर आरोपी हा याच संस्थेत देखरेखीचं काम करत होता. शनिवारी मध्यरात्री ही मुलं झोपलेली असताना आरोपी दबक्या पावलांनी त्यांच्या खोलीत जाऊन त्यांच्या शेजारी झोपला. मुलं झोपेत असतानाच त्याने त्यांच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले.

हा सर्व प्रकार एका महिलेला समजला. तिने देखील कुठेही वाच्यता न करता महाराजाच्या दुष्कृत्याला साथ दिली व हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या मुलांनी आपल्या आईला पडलेला प्रकार सांगितल्यानंतर ही गोष्ट उघडकीस आली. या प्रकरणी मुलांच्या पालकांनी पोलिसांत पाँस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी महाराज महेश नामदेव मिसाळ याला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी आळंदी पोलिसांनी आरोपीविरोधात पाँस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, साथीदार महिला आरोपी वरील आरोपाचा तपास सुरू असून तिला अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे

Share This News
error: Content is protected !!