पुण्यातील बावधन परिसरात पोस्ट ऑफिसचे लोकार्पण; चीफ पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग यांच्या हस्ते उदघाटन

POST OFFICE IN PUNE: पुण्यातील बावधन परिसरात पोस्ट ऑफिसचे लोकार्पण; चीफ पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग यांच्या हस्ते उदघाटन

612 0

पुणे शहरातील बावधन परिसराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला असल्याने बावधन भागातील नागरिकांना पोस्ट ऑफिस च्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी दूरवरील पाषाण पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागते. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून बावधन भागातील नागरिकांकडून त्यांच्या भागात पोस्ट ऑफिस उघडण्याची मागणी सातत्याने केली जात होती. या मागणीचा विचार करून दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे चीफ पोस्टमास्टर जनरल श्री अमिताभ सिंग यांच्या हस्ते बावधन पुणे 411071 टपाल कार्यालयाचे (post office)उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी पुणे विभागाचे पोस्टमास्तर जनरल श्री रामचंद्र जायभाये, डायरेक्टर ऑफ पोस्टल सर्व्हिसेस सुश्री सिमरन कौर, पुणे शहर पश्चिम विभागाच्या प्रवर अधीक्षक श्रीमती रिपन डुलेट, आदी पोस्ट विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

डाक सेवा जन सेवा या ब्रीद वाक्यानुसार नागरिकांच्या आवश्यकतेप्रमाणे विविध सेवा या बावधन पोस्ट ऑफिस मधून दिल्या जाणार आहेत. यामध्ये पोस्ट ऑफिस सेविंग बँक, आधार कार्ड, स्पीड पोस्ट, रजिस्टर बुकिंग, पार्सल बुकिंग, इंडीया पोस्ट पेमेट्स बँकेच्या सर्व सुविधा अशा पोस्टाच्या अनेक सेवांचा समावेश आहे. बावधन पोस्ट ऑफिस उघडल्यामुळे आता बावधन खुर्द, बावधन बुद्रुक, तलाठी ऑफिस परिसर, मराठा मंदीर परिसर, चांदणी चौक परिसर, एन डी ए रस्ता, बावधन पोलीस स्टेशन, न्याती, ब्रह्मा व्हॅंटेज, राम नगर, पाटील नगर, देशमुख नगर, विज्ञान नगर, आमची कॉलनी, भुंडे वस्ती, बावधन गाव, पुराणिक अर्बिटंट, स्टारगेज, चेलराम हॉस्पिटल, शिंदे नगर इत्यादी परिसरांचा नवीन पिनकोड 411071 असा राहील.

उद्घाटन प्रसंगी बोलताना महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे चीफ पोस्टमास्टर जनरल श्री अमिताभ सिंग यांनी पोस्ट ऑफिसची सेवा केवळ पत्रव्यवहार आणि पार्सल पाठविण्यापुरती मर्यादित नसून, ती जनतेला विविध सुविधांचा लाभ देणारी एक महत्वाची सेवा आहे असे सांगताना ‘डाक सेवा-जन सेवा’ या ब्रीद वाक्याचा उद्देश नागरिकांच्या जीवनात सोपेपणा आणणे, त्यांना वेळेवर आणि विश्वासार्ह सेवा पुरवणे, आणि समाजाच्या विकासात सहकार्य करणे असल्याचा उल्लेख केला. पुणे विभागाचे पोस्टमास्तर जनरल श्री रामचंद्र जायभाये यांनी, “या पोस्ट ऑफिसमुळे बावधन परिसरातील नागरिकांना पोस्टल सेवा अधिक सुलभ, प्रभावी आणि वेळेवर उपलब्ध होतील आणि या भागाच्या सामाजिक-आर्थिक विकासास चालना मिळेल” असे सांगून या सेवांचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन केले.

VALMIK KARAD : वाल्मीक कराडला सरेंडर झाल्याचा फायदा होणार; सहज जामीन मिळणार ? 

https://www.topnewsmarathi.com/crime/can-valmik-karad-will-get-bail-easily/

Share This News
error: Content is protected !!