walmik karad

VALMIK KARAD LAST LOCATION | ‘सीआयडी’ला मिळालं वाल्मीक कराडचं शेवटचं लोकेशन

540 0

संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली असून वाल्मीक कराडचं शेवटचं लोकेशन ‘सीआयडी’च्या हाती लागला आहे. नऊ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची हत्या करण्यात आली. यानंतर वाल्मीक कराड हा फरार असल्याचं पाहायला मिळत असून 11 डिसेंबर रोजी वाल्मीक कराडची त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वर मध्यप्रदेशच्या उज्जैन मधील पोस्ट पहायला मिळाली त्यानंतर 17 डिसेंबर रोजी वाल्मीक कराडचा शेवटचा लोकेशन हे पुण्यामध्ये असल्याचं सीआयडीच्या हाती आलं आहे.

वाल्मीक कराड वर दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://topnewshindi.in/sharmishta-mukherjee-attack-on-congress-there-is-rot-in-the-party/

नेमकं प्रकरण काय

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे राज्यभर पडसाद

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. आमदार संदीप क्षीरसागर यांनी आमदारांना एक बॉडीगार्ड आणि वाल्मीक कराड यांना दोन बॉडीगार्ड कसे? असा सहभाग विधानसभेत उपस्थित करत वाल्मीक कराड आणि या प्रकरणातील आरोपींचे सीडीआर रिपोर्ट तपासा अशी सरकारकडं मागणी केली. केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी आरोपींना फाशी द्या अशी मागणी केली. तर सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळ ही हत्या किती क्रूरपणे केली याची माहिती सभागृहाला दिली. सरपंच देशमुख यांच्या अंगावर मारहाण झालेले काही कथित फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकही आक्रमक झाले.

हे ही वाचा 👇

SANTOSH DESHMUKH | संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट; ‘तो’ व्हिडीओ सीआयडीच्या हाती

VALMIK KARAD BEED: वाल्मिक कराड समर्थकांकडून कराडची इमेज क्लीन करण्याचे प्रयत्न

संतोष देशमुख हत्या प्रकरण: तपासात कुचराई केल्याप्रकरणी एसपी बारगळ यांच्या अडचणीत वाढ; तुरुंगवास होणार ?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचे डोळे जाळले गेले का? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं ‘हे’ धक्कादायक कारण

BEED CRIME: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून

Share This News
error: Content is protected !!