हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्याने रागाच्या भरात आपल्या सासरच्या मंडळींवर गोळीबार (firing) केल्याची धक्कादायक घटना घडली ( hingoli crime) आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेत पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नी आणि मेव्हण्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 24 डिसेंबर रोजी घडली. विलास मूकाडे असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. कौटुंबिक वादातून पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या कुटुंबासह बायकोच्या माहेरातील लोकांवरही गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता. तर पत्नीचा भाऊ म्हणजेच मेहुना गंभीर जखमी होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यान त्याचाही मृत्यू झाला आहे. या आरोपीने आपली पत्नी, सासू, मुलगा व मेव्हण्यावर गोळीबार केला होता. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून सासू आणि त्याच्या 2 वर्षाच्या मुलावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या धक्कादायक प्रकरणा नंतर आरोपी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. त्याचबरोबर त्याचं नोकरीवरून निलंबन देखील करण्यात आलं आहे. तसेच त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटकही करण्यात आली आहे.