रक्षकच बनले भक्षक! ऑन ड्युटी पोलिसाचे 5 वर्षीय चिमुकलीची अश्लील चाळे

PUNE CRIME: रक्षकच बनले भक्षक! ऑन ड्युटी पोलिसाचे 5 वर्षीय चिमुकलीची अश्लील चाळे; नेमकं प्रकरण काय ?

598 0

राज्यभरात महिला आणि विशेषतः लहान मुलींबरोबर होणाऱ्या अत्याचारांची प्रकरणं समोर येत आहेत. हे महिला अत्याचार रोखण्यासाठी पोलीस कमी पडत असल्याची टीका अनेकदा केली जाते. मात्र पोलिसानेच पाच वर्षांच्या चिमुकलीशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार पुण्यात (pune crime) उघडकीस आला आहे. त्यामुळे रक्षकच भक्षक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

या गुन्ह्याची फिर्याद चिमुकलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात (Lonavala Gramin Police Station) दिली आहे. त्यानुसार ख्रिसमसची सुट्टी असल्याने विसापूर किल्ल्यावर फिरण्यासाठी हजारो पर्यटकांची गर्दी होती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ही लावण्यात आला होता. त्याच ठिकाणी आरोपी पोलीस सचिन सस्ते हा ऑन ड्युटी होता.

त्यावेळी सस्ते याने जवळच असलेल्या हॉटेलमध्ये जेवण केलं. जेवणाचं बिल देण्यासाठी तो काउंटरला आला त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. बिल दिल्यानंतर त्याची नजर तिथेच खेळत असलेला पाच वर्ष चिमुकलीवर पडली. त्याने तिला लघुशंकेच्या बहाण्याने हॉटेलच्या मागे नेलं. तिथे तिच्याबरोबर अश्लील चाळे केले. त्यावर मुलीने विरोध केला. त्यावेळी त्याने तुला चॉकलेट देतो पण तू कुणालाही काहीही सांगू नकोस, असं दरडावलं. मात्र या मुलीने ही घटना आईला सांगितली. त्यानंतर तिने थेट लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली. याप्रकरणी आरोपी पोलीस सस्ते याला अटक करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!