दिवंगत प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारक अनावरणाच्या निमित्तानं सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची भेट झाली.या भेटीदरम्यान विनोद कांबळी इच्छा असूनही सचिनला मिठी मारू शकला नाही. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल देखील झाला. या व्हिडिओमध्ये विनोद कांबळे याची तब्येत खालवल्याचं दिसून येत होतं. नुकतंच विनोद कांबळी घरात चक्कर येऊन पडल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
नुकतंच दिवंगत प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारक अनावरणाच्या निमित्तानं सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची भेट झाली.या भेटीदरम्यान विनोद कांबळी इच्छा असूनही सचिनला मिठी मारू शकला नाही. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल देखील झाला. या व्हिडिओमध्ये विनोद कांबळे याची तब्येत खालवल्याचं दिसून येत होतं.
क्रिकेट चाहता प्रचंड अस्वस्थ झाला होता. प्रत्येक जण प्रश्न विचारत होता की विनोद कांबळीला नेमकं काय झालं? हा प्रश्न चाहत्यांच्या मनात असतानाच , नुकतंच विनोद कांबळी घरात चक्कर येऊन पडला. त्यानंतर त्यांना तात्काळ ठाण्याच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला त्याला यूरिनरी इन्फेक्शन आणि ताण येत असल्याची तक्रार होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्यानंतर आता त्याच्या आजाराबाबत मेडिकल रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा झाला आहे.रिपोर्टनुसार कांबळीच्या मेंदूत रक्ताच्या गुठल्या झाल्या आहेत.आता डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार होत आहेत. रुग्णालयाच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी कांबळीवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला असून पुढील काही दिवस विनोद कांबळीवर उपचार केले जाणार आहेत. कांबळीला बीसीसीआयकडून मिळणारी पेन्शन हा त्याचा एकमेव उत्पन्नाचं स्त्रोत आहे. याबाबतचा खुलासा त्याने स्वत:च 2022 केला होता. बीसीसीआयकडून त्याला दरमहा 30 हजार रुपये पेन्शन मिळतं. विनोद कांबळीला दोन मुलं असून त्यांच्या देखभालीसाठी रिहॅबमध्ये जाण्याची तयारी दाखवली होती. आता विनोद कांबळीच्या तब्येतीत कधी सुधारणा होते. याची वाट आता क्रिकेटच्या चाहता पाहतोय.