‘राज’ गर्जना होणार! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला अखेर परवानगी

522 0

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या जाहीर सभेला परवानगी अखेर परवानगी मिळाली आहे. औरंगाबाद पोलिसांकडून ही परवानगी देण्यात आली आहे.

औरंगाबादच्या राज ठाकरेंच्या सभेला आता परवानगी मिळणार मिळाल्याने राज ठाकरे यांच्या या सभेची उत्सूकता राज्याच्या जनतेमध्ये आहे. राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 1 मे रोजी ही जाहीर सभा होणार आहे.

राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेत औरंगाबादच्या या सभेची घोषणा केली होती. तेव्हापासूनच या सभेची मोठी चर्चा सुरु होती. मात्र पोलीस या सभेला परवानगी देणार की नाही असा सवाल निर्माण झालेला होता. अखेर आज पोलिसांनी या सभेला परवानगी दिली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!