PUNE ACCIDENT: पुण्यात डंपरने फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडलं

PUNE ACCIDENT: पुण्यात डंपरने फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडलं; मृतांच्या नातेवाईकांनी सांगितला अपघाताचा घटनाक्रम

540 0

पुण्यनगरीला अपघात नगरी म्हणून देखील ओळखलं जाऊ शकतं. अनेक भीषण अपघात पुण्यात गेल्या काही वर्षात घडले आहेत. अशाच एका मोठ्या अपघाताने पुण्यात मृत्यू तांडव घडवलंय. भरधाव वेगात आलेल्या एका डंपर ने फुटपाथवर झोपलेल्या चक्क नऊ जणांना चिरडलं‌ (pune accident). ज्यामध्ये दोन चिमुकल्यांचा आणि एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मद्यधुंद डंपर चालकाने 3 निष्पाप लोकांचा बळी घेतलाय. हा अपघात नेमका कसा झाला, वाचा सविस्तर.

पोटाची खळगी भरण्यासाठी गावाखेड्यातून पुण्यात आलेले हे कामगार अनेक दिवसांपासून वाघोली परिसरातील केसनंद फाट्याजवळ वास्तव्यात होते. ते रोज याच परिसरातील फूटपाथवर झोपायचे. तसेच कालही झोपले होते. मध्यरात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान या झोपलेल्या लोकांना भरधाव वेगात आलेल्या डंपर ने चिरडलं. या अपघातात एकूण नऊ जण गंभीर जखमी झाले, तर तीन जणांचा मृत्यू झाला. वैभवी रितेश पवार ( वय १ वर्षे ), वैभव रितेश पवार (वय २ वर्षे), रीनेश नितेश पवार (वय ३० वर्षे) अशी मृतांची नावं आहेत. तर सहा जण गंभीर जखमी आहेत.

TOP NEWS MARATHI : TOP NEWS MARATHI : रस्सीखेच! दादा Vs दादा पुण्याचे ‘पालक’ कोण?

https://youtu.be/9GmqBrSo6y4

चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा आढावा घेतला. हा डंपर बिल्टवेस् इंटरप्राईजेस कंपनीचा असल्याची माहिती मिळाली असून मद्यधुंद अवस्थेत डंपर चालवणाऱ्या गजानन शंकर तोट्रे या चालकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली. अपघात झाल्यानंतर सकाळी आमदार माऊली कटके यांनी देखील घटनास्थळाला भेट घेत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलून अपघातग्रस्तांना आर्थिक मदत देणार असल्याचं जाहीर केलं.

अवजड वाहनांमुळे अपघातात वाढ 

पोर्शे कार अपघाताने ज्या पद्धतीने पुण्याला हादरवून टाकलं होतं तसाच हा अपघात आहे. कष्ट करून पोट भरण्यासाठी आलेल्या निष्पाप नागरिकांचा या अपघातात बळी गेला आहे. आरोपी चालकाला अटक करण्यात आली असून त्याला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी जनसामान्यांकडून केली जात आहे. मात्र यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीचा आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय.

PUNE CRIME : मामाशी भाचीचं लग्न करायला नकार दिल्याने भावानेच केला मोठ्या भावाचा खून; पुण्यातील धक्कादायक घटना

https://www.topnewsmarathi.com/crime/younger-brother-stabbed-elder-brother-by-knife-in-pune/

Share This News
error: Content is protected !!