Karnataka Assembly : विधानसभेच्या बाकांवर ठेवण्यात आले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो!

675 0

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरूवारी भर संसदेत केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्याचा निषेध म्हणून कर्नाटक विधानसभेतील बाकांवर आंबेडकरांचे फोटो ठेवण्यात आले. काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी त्यांच्या ट्विटरवरून आंबेडकर नावाचा जप करत कर्नाटक विधानसभेतील ‘तो’

फोटो देखील पोस्ट केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरूवारी संसदेत,’अभी एक फॅशन हो गया है, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर… इतना नाम अगर भगवान का देते तो सात जन्मो तक स्वर्ग मिल जाता’, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा निषेध म्हणून देशभरात आंदोलन, निदर्शनं सुरू असताना कर्नाटक विधानसभेतील बाकांवर आंबेडकरांचे फोटो ठेवून अनोखा निषेध नोंदवण्यात आला. त्यामुळं कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरले. बेळगावीच्या सुवर्णा सौधा येथे झालेल्या अधिवेशनात अमित शाह यांच्या विधानावरून काँग्रेस आणि भाजप सदस्यांमध्ये भांडण झालं, झटापटही झाली.

कर्नाटक विधानसभेतील गदारोळावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी ट्विटरवर आंबेडकरांच्या नावाचा जप करत, “कर्नाटक विधानसभेतील ट्रेझरी बेंच आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर… असा जयघोष करत आहेत. तुम्हाला या फॅशनची समस्या आहे. @AmitShah & @BJP4India?”, अशा ओळी पोस्ट केल्या.

सुरूवातीला काँग्रेसचे आमदार बी. के. हरिप्रसाद यांनी विधानपरिषदेत आंबेडकरांचा फोटो प्रदर्शित केला आणि त्यावर तातडीनं चर्चा करण्याचं आवाहन केलं. त्यावर विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होराट्टी यांनी सुरूवातीला चर्चेला परवानगी देण्याचं मान्य केलं मात्र त्यानंतर शाह स्वत:चा बचाव करण्यासाठी उपस्थित नसल्याचं सांगून आपला निर्णय मागं घेतला. तिकडं विधानसभेत काँग्रेस सदस्यांनी आंबेडकरांचे फोटो लावून शाह आणि भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केल्यानं हा वाद हाणामारीत रूपांतरित झाला.

Share This News
error: Content is protected !!