BREAKING NEWS | ‘गेट वे ऑफ इंडिया’हून जाणारी बोट उलटली

4657 0

गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली आहे. गेट वे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात ही दुर्घटना घडली आहे. बोटीत 30 ते 35 हून अधिक प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

एलिफंटा येथे जाणारी ‘नीलकमल’ नावाची फेरीबोट उरण, कारंजा येथे बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामध्ये 30 ते 35 प्रवासी असल्याचे समजते. नौदल, जेएनपीटी व तटरक्षक दल व यलोगेट पोलीस ठाण्यातील आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्य चालू आहे. घटनास्थळी रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, मुंबई सागरी मंडळाचे अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे.

Share This News
error: Content is protected !!