RAM SHINDE | राम शिंदेंनी भरला विधान परिषद सभापती पदासाठी अर्ज; कसं आहे पक्षीय बलाबल ?

354 0

महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी (LEGISLATIVE COUNCIL SPEAKER)उद्या म्हणजे 19 डिसेंबर रोजी निवडणूक होत असून या निवडणुकीसाठी भाजपाचे माजी मंत्री व विधानपरिषद (MAHARASHTRA LEGISLATIVE COUNCIL) आमदार राम शिंदे (RAM SHINDE) यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADANVIS) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (EKNATH SHINDE)व अजित पवार (AJIT PAWAR) यांच्यासह कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (CHANDRASHEKHAR BAWANKULE) व कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील (CHANDRAKANT PATIL) यांच्या उपस्थितीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

कोण आहेत राम शिंदे?

राम शिंदे यांनी कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातून प्रतिनिधित्व केलं असून 2019 च्या निवडणुकीत रोहित पवाराकडून त्यांना पराभूत व्हावं लागलं त्यानंतर भाजपाकडून त्यांची वर्णी विधान परिषदेवर लावण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये राम शिंदे यांनी सुरुवातीला राज्यमंत्री आणि त्यानंतर कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिलं असून 2024 ला ही भारतीय जनता पक्षाकडून राम शिंदे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती मात्र अवघ्या 1243 मतांनी त्यांचा विधानसभेला पराभव झाला.

कसं आहे विधान परिषदेतील संख्याबळ

महाराष्ट्र विधान परिषदेच्या आमदारांची संख्या एकूण 78 असून यापैकी सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपाचे 19 शिवसेनेचे 6 राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचे प्रत्येकी 5 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचे प्रत्येकी 7 अपक्ष 3 आणि राज्यपाल नियुक्त 7 असं संख्याबळ आहे.

Ajit Pawar Press Conference : अमोल मिटकरींची विधान परिषद प्रतोदपदी नियुक्ती

SUNANDA PAWAR: दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं; रोहित पवारांच्या मातोश्रींचं मोठं विधान

https://topnewshindi.in/chance-of-becoming-mla-minister-from-pune-district/

Share This News
error: Content is protected !!