राज्यात 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा (VIDHANSABHA ELECTION) निकाल लागला असून 232 जागांसह महायुतीला (MAHAYUTI) स्पष्ट बहुमत मिळालं त्यानंतर 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADNAVIS) यांनी मुख्यमंत्रीपदाची (CHIEF MINISTER) तर एकनाथ शिंदे (EKNATH SHINDE) अजित पवार (AJIT PAWAR)यांनी उपमुख्यमंत्रीपदाची (DEPUTY CHIEF MINISTER) शपथ घेतली.
आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत असून महायुतीचे 39 मंत्री शपथ घेत आहेत मात्र या मंत्रिमंडळातून भाजपाने चार माजी मंत्र्यांचा पत्ता कट केला आहे. तर शिवसेनेकडून तीन तर राष्ट्रवादीकडून दोन दिग्गज नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
भाजपाकडून कुणाचा पत्ता कट
भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, विजयकुमार गावित या नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
शिवसेनेकडून कुणाचा पत्ता कट
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत या मंत्र्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे
राष्ट्रवादीकडून कुणाचा पत्ता कट
राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते नेते छगन भुजबळ यांच्यासह दिलीप वळसे पाटील यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
CABINET FORMATION: ठरलं! 35 जण घेणार मंत्रीपदाची शपथ; वाचा संपूर्ण यादी
https://topnewshindi.in/chance-of-becoming-mla-minister-from-pune-district/