AMIT SHAH: सकाळी अजित पवार आता अमित शाह शरद पवारांच्या भेटीला

847 0

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे (Nationalist Congress Party SharadChandra Pawar) प्रमुख माजी कृषीमंत्री शरद पवार (Sharad Pawar)यांचा आज 85 वा वाढदिवस असून शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर शरद पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी गर्दी पाहायला मिळते.

आज सकाळीच अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) व पुत्र पार्थ पवार (Partha Ajit Pawar) यांच्यासह शरद पवार यांची भेट घेतली होती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री व येवला विधानसभा मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) उपस्थित होते.

अजित पवार यांनी शरद पवार यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर आता केंद्रीय गृह (Home Minister) आणि सहकार मंत्री (Minister of Co-operation) अमित शाह हे शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

आजच केंद्रीय कॅबिनेटनं एक देश एक निवडणूक (One country, one election) विधेयकाला मंजुरी दिली आहे. आणि त्यातच आता अमित शाह हे शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी गेल्याने केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठीही भेट होती की या भेटीत कोणते राजकीय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

AJIT PAWAR MET SHARAD PAWAR: शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त पवार कुटुंबाचं “गेट-टुगेदर”; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Share This News
error: Content is protected !!