: लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार ? माजी मंत्री अदिती तटकरे यांनी दिली माहिती

LADKI BAHIN YOJANA: लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार ? माजी मंत्री अदिती तटकरे यांनी दिली माहिती

465 0

विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालं. या यशात मोठा वाटा ठरली ती लाडकी बहिणी योजना.. मात्र आता महायुतीचं नवं सरकार आल्यानंतर हीच लाडकी बहिणी योजना (ladki bahin Yojana) बंद होणार, योजनेचे निकष बदलणार, अनेक महिलांना आता पैसे मिळणार नाहीत, अशा चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे याचं चर्चांना ब्रेक लावत माजी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी खंडन केलं आहे.

लाडकी बहीणचे निकष बदलणार ?

माजी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी एख पत्रक समाजमाध्यमांवर शेअर केलं आहे. या पत्रकात म्हंटल आहे की, ‘सर्वांना कळविण्यात येते की राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या असे निर्दशनास आलेले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमांवर रिल्स व व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे.
याअनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तींमध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल.’

पुढे या पत्रकात असेही लिहिण्यात आलं आहे, ‘महिला व बालकल्याण विभागाने वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांना सुचवले आहे की त्यांनी लोकांमधील संभ्रम दूर करावा. सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरुन तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी.’ या शब्दात पत्रकार द्वारे जनतेला आवाहन करण्यात आलं आहे.

अदिती तटकरे म्हणाल्या….

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे. एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून याबाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे. तरी, याबाबत समाज माध्यमांतून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये ही नम्र विनंती’, अशी पोस्ट अदिती तटकरे यांनी समाज माध्यमांवर केली आहे. याच पोस्ट सह त्यांनी पत्रक देखील शेअर केलं आहे.

Share This News
error: Content is protected !!