पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून भाजपाचे विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर यांच्या अपहरण झालेल्या मामाचा खून करण्यात आला आहे.
सतीश सातबा वाघ असं आमदार योगेश टिळेकर यांच्या खून झालेल्या मामाचं नाव आहे. हडपसर भागातील फुरसुंगी फाटा येथे सोमवारी सकाळी घडली त्यांचं अपहरण झालं होतं
दिलेल्या माहितीनुसार, आमदार योगेश टिळक यांचे मामा सतीश वाघ हे सकाळी सोलापूर रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल ब्लू बेरीसमोर थांबले होते.
तिथे अचानक एक चारचाकी गाडी येऊन थांबली. त्या गाडीतून उतरलेल्या दोघांनी सतीश वाघ यांनी जबरदस्तीने गाडीत बसवले. सतीश वाघ यांचे चौघांनी अपहरण केले आहे. असे त्यांच्या मुलाने दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर आता त्यांचा खून झाला असल्याचं समोर आलं आहे.