Yogesh Tilekar: भाजप आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचं अपहरण

453 0

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली असून भाजपचे (BJP) विधानपरिषद (MLC) आमदार योगेश टिळेकर (YOGESH TILEKAR) यांच्या मामाचा अपहरण करण्यात आलंय

सतीश सातबा वाघ असं आमदार योगेश टिळेकर यच्या अपहरण झालेल्या मामाचं नाव आहे. हडपसर भागातील फुरसुंगी फाटा येथे सोमवारी सकाळी घडली.

ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार योगेश टिळक यांचे मामा सतीश वाघ हे सकाळी सोलापूर रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल ब्लू बेरीसमोर थांबले होते.

तिथे अचानक एक चारचाकी गाडी येऊन थांबली. त्या गाडीतून उतरलेल्या दोघांनी सतीश वाघ यांनी जबरदस्तीने गाडीत बसवले. सतीश वाघ यांचे चौघांनी अपहरण केले आहे. असे त्यांच्या मुलाने दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

विधान परिषद निवडणुकीचा पहिला निकाल आला; भाजपाचे योगेश टिळेकर विजयी

Crime Video : अल्पवयीन मुलीचे घरातून अपहरण करून आरोपींचा ऑनकॅमेरा बलात्कार करण्याचा प्रयत्न

Share This News
error: Content is protected !!