महाराष्ट्रात महायुतीचं सरकार (Mahayuti Goverment) स्थापन झाला असून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याच्या मुख्यमंत्री(CHIEF MINISTER) पदाची शपथ घेतले आहे तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री (DEPUTY CHIEF MINISTER) पदाची शपथ घेतली.
त्यानंतर आजपासून विधानसभेचं (ASSEMBLY) विशेष अधिवेशन (SPECIAL SESSION) सुरू झालं आहे. 9 डिसेंबरपर्यंत हे विशेष अधिवेशन चालणार असून 9 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांची (ASSEMBLY SPEAKER) निवड होणार आहे.
विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर (RAHUL NARVEKAR) यांची पुन्हा एकदा निवड संधी दिली जाणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राहुल नार्वेकर कुलाबा विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झाले असून शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता भाजपा असा राहुल नार्वेकर यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचा सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्ष पदाची संधी मिळाली होती राहुल नार्वेकर यांच्या कार्यकाळात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हा संदर्भातील निर्णय त्यांनी दिला आहे.
Rahul Narvekar : शिवसेनेतून सुरूवात, पहिल्याच टर्ममध्ये अध्यक्ष; कसा आहे नार्वेकरांचा प्रवास