विरोधी बाकावर बसलेल्या हेमंत रासनेंना अजित पवारांनी हाताला धरून आणलं; सभागृहात एकच हास्यकल्लोळ

535 0

महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच सत्रात एक गमतीशीर प्रसंग घडला. राज्यभरात गाजलेले काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा पराभव करून कसब्यावर विजय मिळवलेले नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने (Hemant Rasne) हे चुकून विरोधी बाकावर बसले. त्याचवेळी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM ajit pawar) यांनी त्यांना योग्य बाकावर बसवलं. ज्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

आज विधानसभेत नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी पहिल्यांदाच विधान भवनात आमदार म्हणून हेमंत रासने यांनी प्रवेश केला. विधान भवनात विरोधी पक्षाचे आणि सत्ताधारी पक्षाची आसनव्यवस्था वेगवेगळी असते. मात्र रासने हे चुकून विरोधकांच्या बाकावर जाऊन बसले.
ही बाब सभागृहात हजर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी थेट रासने यांना हाताला धरून सत्ताधारी बाकावर नेले व तिथे बसण्यास सांगितलं.

या प्रसंगाने सभागृहातील सगळेच जण खळखळून हसले. तर हेमंत रासने यांनी हा प्रसंग खेळाडू वृत्तीने घेत अजित पवार यांचे आभार मानले.

Share This News
error: Content is protected !!