PARBHANI CRIME : परभणीतील सामूहिक आत्महत्येचं गूढ उलगडलं

PARBHANI CRIME : परभणीतील सामूहिक आत्महत्येचं गूढ उलगडलं; पोलीस तपासात समोर आली धक्कादायक माहिती ?

407 0

काही दिवसांपूर्वी परभणीच्या गंगाखेडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केली होती. या प्रकरणाची राज्यभरात चर्चा झाली. आणि परभणीत खळबळ उडाली. मात्र ही आत्महत्या (suicide) नेमक्या का करण्यात आल्या ? याचं गूढ उलगडलेलं नव्हतं. मात्र याच प्रकरणाचा तपास लावण्यात पोलिसांना (parbhani police) यश आलं आहे.

परभणीच्या गंगाखेड शहराजवळ असलेल्या धारखेड रेल्वे रुळावर एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिक आत्महत्या केली. मयत तिघांपैकी पुरुष असलेले मसनाजी तुडमे हे शिक्षक होते. तर त्यांच्यासह त्यांची पत्नी रंजना आणि मुलगी अंजली तुडमे यांनी देखील सामूहिक आत्महत्या केली. हे कुटुंबीय मूळचे लातूरच्या अहमदपूर मधील रहिवासी होते. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली. मात्र या आत्महत्ये मागे नक्कीच काहीतरी मोठं कारण असणार, या दृष्टीने पोलिसांनी तपासून केला. आणि धक्कादायक माहिती समोर आली.

या प्रकरणातील मयत मुलीला एका तरुणाने लग्नासाठी गळ घातली होती. ‘माझ्यासोबत लग्न कर अन्यथा तुझ्यासोबत चे फोटो व्हिडिओ व्हायरल करेन’, अशी धमकी हा मुलगा देत होता. ही धमकी केवळ मुलीलाच नाही तर तिच्या आई-वडिलांनाही दिली जात होती. आयुष्यभर कष्टाने कमावलेली प्रतिमा खराब होऊन कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने मुलीसह आई-वडिलांनी देखील आत्महत्या करणं स्वीकारलं. दरम्यान या प्रकरणी गंगाखेड पोलिसांनी आरोपी तरुणा विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

दरम्यान या प्रकरणी मयत मसनाजी तुडमे यांचे भाऊ शिवाजी तुडमे फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी शिवम नारायण राऊत (21, रा परभणी ) याला गंगाखेड पोलिसांनी अटक केली आहे.

Share This News
error: Content is protected !!