महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी समोर आली असून राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून मधुकर पिचड हे राष्ट्रवादीसोबत होते.
एक जून 1941 मध्ये जन्मलेल्या मधुकरराव पिक्चर यांनी 1972 मध्ये अकोले पंचायत समितीवर सदस्य निवड झाली. पुढं 1972 ते 1980 पंचायत समितीवर सभापती म्हणून निवड झाली त्यानंतर 1980 पासून 2009 पर्यंत सलग 7 वेळेस आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात बी ए एल एल बीचे शिक्षण घेतलं होतं आणि तिथूनच विद्यार्थी राजकारणाला सुरुवात झाली. 1995 ते जुलै 1999 या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदाची धुरा सांभाळली होती.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही पिचड यांनी धुरा सांभाळली होती. 2019 मध्ये मधुकर पिचड यांनी आपला मुलगा वैभव पिचड यांच्यासह त्यावेळी विधानसभा निवडणुकीत वैभव पिचड यांचा पराभव झाला.
– मधुकर पिचड यांनी १९६१ मध्ये अमृत सागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली त्यानंतर मधुकर पिचड यांनी १९९३ मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापन केला
मधुकर पिचड यांनी आदिवासी विकास, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण, प्रवास विकास आणि पशु, संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे.
KALIDAS KOLAMBKAR: विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर