महाराष्ट्र विधानसभेच्या 288 विधानसभा मतदार संघासाठी नुकतीच निवडणूक पार पडली. निकाल लागले आणि महायुतीला स्पष्ट बहुमतही मिळालं आणि सरकारही स्थापन झालं.
मात्र महाराष्ट्राच्या विधानसभेत एक आमदार असेही होते की जे एकाच पक्षातून निवडणूक लढले मात्र प्रत्येक निवडणुकीत त्यांना वेगवेगळी निवडणूक चिन्ह मिळाली मात्र तरीही ते सातत्याने विजय मिळवत आले. कोण आहे हे आमदार पाहूया त्यांचीच ही गोष्ट.
पुरंदर विधानसभा मतदारसंघातून दादा जाधवराव हे सलग 7 वेळा विजयी झाले होते त्यांनी राज्याच्या कृषी व सैनिक कल्याण खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे.
दादा जाधवराव यांचा पक्ष एकच होता पण कालांतराने त्यांची जनता पक्ष, जनता दल, जनता सेक्युलर, अशी नावे बदलत गेली. तसेच चिन्हेही बदलत गेली. समाजवादी विचारांशी त्यांची बांधिलकी होती.
दादा जाधवरावांनी पहिली निवडणूक 1972 साली झोपडी चिन्हावर लढली. 1978 साली नांगरधारी शेतकरी हे चिन्ह मिळाले. 1980 साली छत्री हे चिन्ह मिळाले.1985 साली नांगरधारी शेतकरी हे चिन्ह मिळाले. 1990 व 1995 साली चक्र हे चिन्ह मिळाले.
त्यानंतर ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी हे चिन्ह मिळालं. त्यानंतर डोक्यावर भारा घेतलेली महिला हे चिन्ह त्यांना मिळाले. दादासाहेबांनी अशा विविध चिन्हांवर निवडणुका लढवल्या आणि विशेष म्हणजे त्या जिंकल्याही