देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची (Chief Minister) शपथ घेतली असून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची (deputy chief minister) शपथ घेतली.
देवेंद्र फडणवीस हे राज्याचे 21 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे या अगोदर 2014 ते 2019 या संपूर्ण पाच वर्षाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले होते. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 पर्यंत केवळ 72 तासांसाठीच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते झाले आणि नंतर एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी ही सांभाळली.
त्यानंतर आता पुन्हा तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
आतापर्यंत झालेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ
यशवंतराव चव्हाण | १ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२ | २ वर्षं ३ दिवस | |
२ | मारोतवार कन्नमवार | २० नोव्हे. १९६२ ते २४ नोव्हें. १९६३ | १ वर्षं ४ दिवस |
३ | पी. के. सावंत | २५ नोव्हें. १९६३ ते ५ डिसें. १९६३ | १० दिवस |
४ | वसंतराव नाईक | ५ डिसें. १९६३ ते २१ फेब्रु. १९७५ | ११ वर्षं ७८ दिवस |
५ | शंकरराव चव्हाण | २१ फेब्रु. १९७५ ते १७ मे १९७७ | २ वर्षं ८५ दिवस |
६ | वसंतदादा पाटील | ५ मार्च १९७८ ते १८ जुलै १९७८ | १ वर्षं ६२ दिवस |
७ | शरद पवार | १८ जुलै १९७८ ते १७ फेब्रु. १९८० | १ वर्षं २१४ दिवस |
राष्ट्रपती राजवट | १७ फेब्रुवारी १९८० ते ८ जून १९८० | ११२ दिवस | |
८ | ए. आर. अंतुले | ९ जून १९८० ते २१ जाने. १९८२ | १ वर्षं २२६ दिवस |
९ | बाबासाहेब भोसले | २१ जाने. १९८२ ते २ फेब्रु. १९८३ | १ वर्षं १२ दिवस |
१० | वसंतदादा पाटील | २ फेब्रु. १९८३ ते ३ जून १९८५ | २ वर्षं १२१ दिवस |
११ | शिवाजीराव पाटील निलंगेकर | ३ जून १९८५ ते १२ मार्च १९८६ | २८२ दिवस |
१२ | शंकरराव चव्हाण | १२ मार्च १९८६ ते २६ जून १९८८ | २ वर्षं १०६ दिवस |
१३ | शरद पवार | २६ जून १९८८ ते २५ जून १९९१ | २ वर्षं ३६४ दिवस |
१४ | सुधाकरराव नाईक | २५ जून १९९१ ते ६ मार्च १९९३ | १ वर्षं २५४ दिवस |
१५ | शरद पवार | ६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५ | २ वर्षं ८ दिवस |
१६ | मनोहर जोशी | १४ मार्च १९९५ ते १ फेब्रु. १९९९ | ३ वर्षं ३२४ दिवस |
१७ | नारायण राणे | १ फेब्रु. १९९९ ते १८ ऑक्टो. १९९९ | २५९ दिवस |
१८ | विलासराव देशमुख | १८ ऑक्टो. १९९ ते १८ जाने. २००३ | ३ वर्षं ९२ दिवस |
१९ | सुशीलकुमार शिंदे | १८ जाने. २००३ ते १ नोव्हें. २००४ | १ वर्षं २८८ दिवस |
२२ | विलासराव देशमुख | १ नोव्हें. २००४ ते ८ डिसें. २००८ | ४ वर्षं ३७ दिवस |
२१ | अशोक चव्हाण | ८ डिसें. २००८ ते ११ नोव्हें. २०१० | १ वर्षं ३३८ दिवस |
२२ | पृथ्वीराज चव्हाण | ११ नोव्हें. २०१० ते २८ सप्टें. २०१४ | ३ वर्षं ३२१ दिवस |
राष्ट्रपती राजवट | २८ सप्टें. २०१४ ते ३० ऑक्टो. २०१४ | ३२ दिवस | |
२३ | देवेंद्र फडणवीस | ३१ ऑक्टो. २०१४ ते १२ नोव्हें. २०१९ | ५ वर्षं १२ दिवस |
राष्ट्रपती राजवट | १२ नोव्हें. २०१९ ते २३ नोव्हें. २०१९ | ११ दिवस | |
२४ | देवेंद्र फडणवीस | २३ नोव्हें. २०१९ ते २८ नोव्हें. २०१९ | ५ दिवस |
२५ | उद्धव ठाकरे | २८ नोव्हें. २०१९ ते ३० जून २०२२ | २ वर्षं २१४ दिवस |
२६ | एकनाथ शिंदे | ३० जून २०२२ ते २६ नोव्हें. २०२४ | २ वर्षं १४९ दिवस
|