SHRIKANT SHINDE: ‘मी कोणत्याही मंत्रीपदाच्या शर्यतीत नाही’; उपमुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना श्रीकांत शिंदे यांनी दिला पूर्णविराम

93 0

महाराष्ट्रात महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू असताना आता यावर स्वतः श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या सर्व बातम्या निराधार व बिनबुडाच्या आहेत असं म्हटलं असून मी राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रीपदाच्या शर्यतीत नाही असंही म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले श्रीकांत शिंदे?

महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे.
माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो, परंतु बातम्या देतांना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा…

Share This News
error: Content is protected !!