EVM

EVM Hacking : ईव्हीएम हॅकिंगसंदर्भात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा खुलासा

141 0

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळवत तब्बल 233 जागा जिंकत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. या निकालानंतर विरोधकांकडून निवडणुकीत ईव्हीएम मशीन हॅक होत असल्याचे आरोप करण्यात आले. तर महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज दाखल केले.

विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या ईव्हीएम हॅकिंगच्या आरोपावरून विरोधकांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

ईव्हीएम हॅकिंगच्या आरोपावर मुख्य निवडणूक अधिकारी ए. एस. चोकलिंगम यांनी ईव्हीएम हॅकिंगचे सर्व प्रकारचे आरोप फेटाळून लावले. यावर स्पष्टीकरण देताना मुख्य निवडणूक अधिकारी ए. एस. चोकलिंगम त्यांनी सांगितलं की ईव्हीएम मशीनला ब्लूटूथ किंवा वायफाय कनेक्ट होत नाही. त्याचबरोबर निवडणुकीत कसलाही प्रकारचं अतिरिक्त मतदान झालं नसल्यासही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त केला होता. त्यानंतर संध्याकाळ नंतर झालेल्या मतदानाचा तपशील द्या अशी मागणी ही महाविकास आघाडी कडून करण्यात आली होती. त्यासाठी 25 जणांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज ही दाखल केले. स्पष्टीकरण देताना कसल्याही प्रकारचं अतिरिक्त मतदान झालं नसल्यास मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

Share This News
error: Content is protected !!