NCP SP: जितेंद्र आव्हाड गटनेते तर आबांच्या लेकाच्या खांद्यावर शरद पवारांनी दिली मोठी जबाबदारी

106 0

मुंबई: महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे 10 आमदार निवडून आले. या 10 आमदारांची बैठक आज प्रदेश कार्यालयात संपन्न झाली असून या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या मुख्य प्रतोद म्हणून देशातील सर्वात तरुण आमदार माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांचे चिरंजीव आमदार रोहित आर आर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गटनेतेपदी कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!