महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला असून सर्वच्या सर्व उमेदवारांना पराभवाचा सामना सहन करावा लागला मनसेच्या स्थापनेपासून प्रथमच मनसेचा एकही आमदार आता विधानसभेत नसणार आहे.
अशातच आता मनसेला आणखी एक मोठा धक्का बसला असून मनसेचे डॅशिंग नेते अशी ओळख असलेले अविनाश जाधव यांनी ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत ठाणे व पालघर विधानसभेत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत आहे असं अविनाश जाधव यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.