राज्यात विधानसभा निवडणुकीची निकाल जाहीर झाले. महायुतीला मोठे यश मिळालं. तर महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तर वंचित फॅक्टर मूळ महाविकास आघाडीला मोठा फटका बसला असून महाराष्ट्रात 11 ठिकाणी वंचितमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत झाले.
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला.तर महाविकास आघाडीला केवळ 46 जागांवर समाधान मानावं लागलं. वंचितमुळे मराठवाडा आणि विदर्भात मतांचे विभाजन होऊन महाविकास आघाडीच्या 11 उमेदवारांचा पराभव झाला. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आधी वंचित आणि महाविकास आघाडी मधील बोलणे फिसकटली आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली.
कोणत्या मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसला?
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ
रमेश कराड, भाजपा, 1,12,051 मतं
धीरज देशमुख, काँग्रेस, 1,05,456 मतं
डॉ.विजय अजणीकर,वंचित, 8,824 मतं
धीरज देशमुख यांचा 6595 मतांनी पराभव
परांडा विधानसभा मतदारसंघ
तानाजी सावंत, शिवसेना,1,03,554 मतं
राहुल मोटे, राष्ट्रवादी शरद पवार,1,01,745 मतं
प्रवीण रानबागुल,वंचित ,12,698 मतं
राहुल मोटे यांचा 1,509 मतांनी पराभव
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ
बालाजी कल्याणकर, शिवसेना, 83, 184मतं
अब्दुल सत्तार अब्दुल गफूर,काँग्रेस,79,682 मतं
प्रशांत इंगोले, वंचित, 24,266 मतं
अब्दुल सत्तार अब्दुल गफूर यांचा 3,502 मतांनी पराभव
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ
आनंद तिडके, शिवसेना, 60,445 मतं
मोहन हंबर्डे, काँगेस,58,313 मतं
फारूक अहमद ,वंचित, 33,841 मतं
मोहन हंबर्डे यांचा 2,132 मतांनी पराभव
गंगापूर विधानसभा मतदारसंघ
प्रशांत बंब, भाजपा, 1,25,555 मतं
सतीश चव्हाण राष्ट्रवादी शरद पवार गट, 1,20,540 मतं
अनिल चंडालिया, वंचित, 8839 मतं
सतीश चव्हाण यांचा 5015 मतांनी पराभव
हिंगोली विधानसभा मतदारसंघ
तानाजी मटकुले, भाजपा, 74,584 मतं
रूपालीताई पाटील, शिवसेना ठाकरे गट,63,658 मतं
प्रकाश थोरात, वंचित,23,944 मतं
रूपालीताई पाटील यांचा 10,926 मतांनी पराभव
गंगाखेड विधानसभा मतदारसंघ
रत्नाकर गुट्टे ,रासप, 1,41,544 मतं
विशाल कदम, शिवसेना ठाकरे गट,1,15,252 मतं
सिताराम घनदाट, वंचित, 43,026 मतं
विशाल कदम यांचा 26,292 मतांनी पराभव
बुलढाणा विधानसभा मतदारसंघ
संजय गायकवाड, शिवसेना, 91660 मतं
जयश्री शेळके, शिवसेना ठाकरे गट,90,819 मतं
प्रशांत वाघोडे, वंचित,7146 मतं
जयश्री शेळके यांचा 841 मतांनी पराभव
खामगाव विधानसभा मतदारसंघ
आकाश फुंडकर, भाजपा,1,10,599 मतं
दिलीपकुमार राणा, काँग्रेस, 85,122 मतं
देवराव देवराळे, वंचित, 26,442 मतं
दिलीप कुमार राणा यांचा 25,477 मतांनी पराभव
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ
रणधीर सावरकर, भाजपा, 1,08,619 मतं
गोपाल दातकर, शिवसेना ठाकरे गट,58,006 मतं
ज्ञानेश्वर सुलताने,वंचित,50,681 मतं
गोपाळ दातकर यांचा 50,613 मतांनी पराभव
मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघ
हरीश पिंपळे, भाजपा,91,820 मतं
सम्राट डोंगरदिवे, राष्ट्रवादी शरद पवार गट, 35,865 मतं
सुगत वाघमारे, वंचित,49,608 मतं
सम्राट डोंगरदिवे यांचा 35,864 मतांनी पराभव