Breaking News
Eknath Shinde Resigned: एकनाथ शिंदे यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

Role Of Caretaker CM: काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणजे नेमकं काय? काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना काय असतात अधिकार

392 0

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 230 जागा मिळवत महायुतीला मोठा विजय मिळाला मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 48 तास झाले मात्र तरीही महाराष्ट्राला अजून नवा मुख्यमंत्री मिळाला नाही.

अशातच आज चौदाव्या विधानसभेची मुदत देखील संपली असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामाही दिला आहे.

राज्यात नवा मुख्यमंत्री ठरेपर्यंत एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री राहणार आहेत. आज सकाळी 11 वाजून दहा मिनिटांनी एकनाथ शिंदे हे राजभवनावर दाखल झाले आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणजे काय?

कायदेशीर बाब म्हणून काळजीवाहू मुख्यमंत्री हा नियमित मुख्यमंत्री म्हणूनच काम करतो. मात्र त्यांना मोठे धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत.

नियमित मुख्यमंत्र्यांना काय असतात अधिकार? 

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ज्या पक्षाचा बहुमत असतं त्या पक्षाचा किंवा मित्र पक्षांचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला आहे. जसं 2004 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 71 आणि काँग्रेस पक्षाचे 69 आमदार निवडून आल्यानंतर काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झाला होता. सत्तेत आलेल्या मुख्यमंत्र्याला पहिल्यांदा आपलं मंत्रिमंडळ स्थापन करावं लागतं. मुख्यमंत्री हे विधानसभेला उत्तरदायी असून घटनात्मक तरतुदीनुसार मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात.

Share This News
error: Content is protected !!